सोयगाव,दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह परिसरात बुधवारी रात्री मृगाच्या पावसाचे आगमन झाल्याने सोयगाव परिसरात गुरुवार पासून मृगाच्या खरिपाच्या पेरण्यांच्या कामांनी वेग घेतला होता.मात्र दमदार पावसात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसल्याने सोयगाव-जरंडी रस्त्यावर मात्र झाडे आडवी पडली असल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सोयगाव परिसराला बुधवारी रात्री मृगाच्या दमदार पावसाचे आगमन झाले होते.त्यामुळे सोयगाव परिसरातील ३५ गावातील शिवारात मृगाच्या खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला होता.त्यामुळे गुरुवारी पहाटेपासून तब्बल ३५ गावे ओस पडली होती.बुधवारी झालेल्या पावसाने मात्र बनोटी मंडळाकडे पाठ फिरविली असून सावळदबारा मंडळ मात्र कोरडेठाक होते,मात्र फर्दापूर परिसरात धुव्वाधार पावूस झाला आहे.बुधवारी झालेल्या पावसाची सोयगाव मंडळात-२९ मी.मी आणि जरंडी मंडळात-२२ मी.मी पावसाची नोंद झाली असून बनोटी मंडळात-२ आणि सावळदबारा मंडळ कोरडेठाक असल्याची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे या दोन्ही मंडळातील गावांना मृगाच्या पेरण्यांची चिंता लागून आहे.
निम्मा तालुका कोरडाठाक-
सोयगाव परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने २९ मी.मी ची नोंद केली असतांना बनोटी आणि सावळदबारा मंडळावर वरूणराजाची कृपादृष्टी झालेली नसल्याने मृगाच्या पावसापासून निम्मा तालुका कोरडाठाक होता.