बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी “व्ही-स्कूल” चा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साध्य करावी

“व्ही-स्कूल”(Vschool) या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण

बीड:आठवडा विशेष टीम―कोवीड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळा सुरू होणेस अवधी असल्याने इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग उपलब्ध करून देण्यासाठी व्हीओपीए(VOPA) या पुणे येथील सामाजिक संस्थेच्या सहकार्याने इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी online शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून http://ssc.vopa.in या वेबसाईटचे आज मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांच्या दालनांमध्ये उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत झाले.

जिल्हा परिषदेघा माध्यमिक शिक्षण विभाग व व्हीओपीए (VOPA) सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी Vschool या http://ssc.vopa.in संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

उद्घाटन प्रसंगी शिक्षण विभागातील अधिकारी, तज्ञ मार्गदर्शक शिक्षक व व्होवेल्स आॅफ पीपल्स असोसिएशन (Vowels of the People Association) चे सदस्य उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील इ. १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभाग ( माध्यमिक )जिल्हा परिषद, बीड व VOPA Team सामाजिक संस्था ,पुणे यांचे मार्फत जिल्ह्यातील नामवंत शिक्षकांद्वारे शैक्षणिक साहित्य निर्माण केलेले आहे. याबरोबरच प्रत्येक पाठासाठी डिजिटल माध्यमावरती उपलब्ध असणारे सर्वोत्तम साहित्य, व्हिडिओ, चित्रे ,स्वमूल्यांकन व चर्चेद्वारे शिक्षण अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.VOPA Team यांनी शिक्षकांच्या साह्याने विद्यार्थ्यांना वापरण्यास सोपे व अतिशय उपयुक्त असे साहित्य http://ssc.vopa.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहे.

बीड जिल्ह्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी विनामूल्य हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. करिता जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी त्याचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साध्य करावी असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.