पाटोदा दि.१२:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील अत्यंत महत्वाचे व वर्दळीचे ठिकाण म्हणजे उपजिल्हा अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय पाटोदा असून येथे दररोज शेकडो लोक शासकीय कामकाजा साठी येतात मात्र सर्व ऑफिसच्या मेन गेटवरच मोठे पाण्याचे तळे साचले असल्यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करून प्रवास करतात. यामुळे ह्या साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त कोण करणार असा मोठा प्रश्न शासकीय कामकाजा साठी येणाऱ्या पाटोदा तालुक्यातील जनतेला पडला आहे.