मांजरसुंबा दि.१२:नानासाहेब डिडुळ― आजL दुपारी १ वा.सुरू झालेल्या तासभर मुसळधार पावसाने वारकाच्या नदिला मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने पुर सदृश स्थिती निर्माण होऊन शेतीला तळ्याचे स्वरुप आले होते.बांधबंदिस्ती फुटुन जाऊन शेतक-यांचे शेतातील पेरलेल्या बि-बियाण्यासह शेतातील माती वाहुन गेली आहे, वरील पाणी नदिला मिसळल्यामुळे पोखरवाडा नदिला मोठ्या प्रमाणावर पुर आलाआहे ,जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
चक्रधर गिरे , गिरे वस्ती–
दुपारी तासभर जोराचा पाऊस आला, वावरात पानी मावलं नाही, आणि मग बांध फुटले, त्यामुळे शेतातील पिका बरोबर जमिनीची माती सुद्धा वाहुन गेली.
अक्षय वायभट , वायभट वस्ती–
दुपारी १ वाजता झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील शेणखत ,माती बांध फुटुन गेल्यामुळे काहीच शिल्लक राहिले नाही.तहसिलदारनी नुकसान झालेल्या शेतक-यांच्या जमिनीचे स्थळ पंचनामे करून नूकसान भरपाई द्यावी.
तुषार गायकवाड ,गायकवाड वस्ती–
वारकाच्या नदिला मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसाने पुर आल्यामुळे वायभट वस्ती, गिरे वस्ती, जाधव वस्ती,यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. कमरे ईतक्या पाण्यातून मार्ग काढीत जावे लागते.या ठिकाणी नळ्या टाकून पुल बांधला असता तर परिस्थिती वेगळी असती निदान पावसाळ्यात तरी संपर्क तुटला नसता.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते–
ढगफुटी झाल्याप्रमाणे दुपारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील बांधबंदिस्तीची कामे पावसाने वाहुन गेली, नुसते पाणीच नाही तर शेतातील पेरणी केलेल्या रानातील, बि-बियाने ,खते आणि त्याचबरोबर माती सुद्धा वाहुन गेली. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आधिच आर्थिक झळ सोसलेल्या शेतक-यांना या पावसामुळे अतिरिक्त संकटात टाकले आहे.महसुल प्रशासनाने तात्काळ स्थळ पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.