पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यात आज दिनांक 12 जून रोजी दुपारी एक ते दोन तास जोरदार मुसळदार पाऊस झाल्याने पाटोदा शहरातुन जात असलेल्या माजरा व साळ नदीला पुर आला असुन छोट छोट्या वड्यावरचे पुले वाहुन घेली तर पाटोदा शहरातुन जात असलेला पैठण पंढरपूर व पाटोदा मांजरसुंबा हायवे रोडचे काम चालू असून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे तसेच गुत्तेदाराचा चुकीच्या नियोजनामुळे भाकरे वस्ती वरील शेतीचे तर पाटोदा शहरातील व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे लाखो रुपायचे नुकसान झाले तसेच आज दुपारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने पाटोदा तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पेरलेले बि-बियाण्यासह शेतातील माती सुद्धा वाहुन गेली आहे, त्यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला असून जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी
नगरसेवक संदीप जाधव व नगरसेवक शरद बामदळे यांनी केली आहे.