अंबाजोगाई तालुकाकार्यक्रम

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने ऋचा व ऋग्वेद कुलकर्णी यांचा सत्कार

ऋचा व ऋग्वेदने अंबाजोगाईचे नांव राष्ट्रीय पातळीवर झळकविले-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई दि.१३: येथील योगेश्वरी महाविद्यालय व ५१ महाराष्ट्र बटालियनच्या अंतर्गत एन.सी.सी. विभागाच्या वतीने या वर्षी महाराष्ट्राच्या संघात ऋचा व ऋग्वेद कुलकर्णी या बहिण-भावांची यांची निवड आर.डी.परेडसाठी झाली होती.त्यामध्ये यावर्षी मुलींचा महाराष्ट्र संघ प्रथम आला तर ऋचा कुलकर्णी हिस एन.सी.सी.चा सर्वोच्च सन्मान मिळाला. महाराष्ट्रामधुन फक्त एक छात्राला हा बहुमान मिळाला व तो बहुमान ऋचा कुलकर्णी हिच्या रूपाने मिळाला.तसेच ऋग्वेदचा आर.डी.परेड मध्ये समावेश झाला. त्याने ही उत्तम कामगिरी केली.याबद्दल अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या वतीने कुलकर्णी बहिण-भावांचा सहकार भवन येथे मंगळवार,दि.१२ फेब्रुवारी रोजी बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार केला.

यावेळी त्यांनी दोन्ही बहिण-भावांचे कौतुक करून राष्ट्रीय पातळीवर अंबाजोगाईचे नांव झळकाविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घ्यावी असे मोदी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना ऋचा व ऋग्वेद म्हणाले की एन.सी. सी.मुळे आम्हाला प्रचंड शिकायलाही मिळाले. विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.मध्ये आवश्य सहभाग घ्यावा. आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे.आम्हाला यामुळे भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी माहीती मिळाली. लहानपणीच आम्हाला उच्च पदस्थ लोकांमध्ये राहण्यास मिळाले.जे त्यांच्या पासुन मी शिकले.त्याचा फायदा होतो.मी ही पुढे देशाची सेवा करणार आहे असे ऋचा कुलकर्णी म्हणाली.या प्रसंगी बोलताना मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी अंबाजोगाईचे विद्यार्थी आर.डी.परेडसाठी निवडले गेले पाहिजेत त्या साठी मुलांनी प्रचंड मेहनत करावी. एन.सी.सी.च्या माध्यमातून मुलांवर योग्य सत्कार केल्या जातात.त्यांच्या वर्तनात परिवर्तन केले जाते, त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे ती उपयोगात आणली जाते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई पिपल्स बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय जड यांनी केले तर उपस्थितांचे आभार योगेश्वरी पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने, नगरसेवक सुनिल व्यवहारे,माजी नगरसेवक दत्तु कांबळे, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,आर.वाय.
कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

ऋचा व ऋग्वेदने अंबाजोगाईचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकविले- राजकिशोर मोदी

दिल्ली येथील पथसंचलनासाठी ५१ महाराष्ट्र बटालीयन अंतर्गत योगेश्वरी महाविद्यालयाची ऋचा व तिचा भाऊ ऋग्वेद कुलकर्णी या दोघांची निवड झाली.हे अभिनंदनीय असून एन.सी.सी.मध्ये अत्यंत खडतर मेहनत,प्रवास, सातत्य व राष्ट्रप्रेम जागृत ठेवून कुलकर्णी बहिण-भावांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे व अंबाजोगाई नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. एन.सी.सी.चा सर्वोच्च सन्मान ऋचा कुलकर्णी हिला मिळाला आहे. यामुळे तमाम अंबाजोगाईकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.