अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी शिरल्याने ऋषी एजन्सीजचे लाखो रूपयांचे नुकसान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शहरातील जयवंतीनगर भागात असणाऱ्या ऋषी एजन्सीज (हिरो शोरूम) च्या तळमजल्यावर अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी शिरल्याने ऋषी एजन्सीजचे अंदाजे 27 ते 28 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानीची माहिती मिळताच अंबाजोगाई तहसीलच्या वतीने मंडळ अधिकारी यांनी तात्काळ नुकसानीची पहाणी करून पंचनामा केला.

सन 2001 पासून अंबाजोगाई शरद लोमटे या तरूण उद्योजकांनी ऋषी एजन्सीज (हिरो शोरूम) च्या माध्यमातून अंबाजोगाई व तालुक्यातील वाहनधारकांना दर्जेदार व तत्पर सेवा दिलेली आहे व ते सध्या ही देत आहेत.उद्योग व्यवसायात नांवलौकीक मिळवत असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे क्षणांत होत्याचे नव्हते होवून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.गुरूवार,दिनांक 11 जूनच्या रात्री 10 नंतर ते शुक्रवार,दिनांक 12 जूनच्या पहाटे या कालावधीत अंबाजोगाई शहर व परिसरात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला.सुमारे 62 मी.ली.एवढा पाऊस झाल्याने प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह तयार होऊन हे पाणी जयवंतीनगर भागातील ऋषी एजन्सीज हिरो शोरूमच्या तळ मजल्यात शिरले.सदर पाण्यामुळे हिरो शोरूमच्या तळमजल्यात ठेवलेल्या 15 नवीन दुचाकी गाड्या तसेच दुरूस्तीसाठी आलेल्या 15 दुचाकी गाड्या,8 रॅम्प,3 मोटार,नायट्रोजन मशीन,ऑइल मशीन,बॅटरी चार्जर,पार्ट वॉशिंग मशीन,कॉम्प्युटर,प्रिंटर,8 पाण्याच्या ट्रॉली,फर्निचर यांचे अंदाजे 27 ते 28 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानीची माहिती मिळताच.मंडळ अधिकारी आर.बी.कुमटकर यांनी स्वतः फिरून शोरूमची पाहणी करून पंचनामा केला.यावेळी ऋषी एजन्सीज हिरो शोरूमच्या तळ मजल्यात सर्वञ मोठ्या प्रमाणावर जमा झालेले पाणी व चिखल साचलेला दिसून आला.यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येवू शकतो.

अतिवृष्टीमुळे लाखोंचे नुकसान

याबाबत ऋषी एजन्सीज हिरो शोरूमचे संचालक शरद नागोराव लोमटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,गुरूवार,दिनांक 11 जून 2020 च्या रात्री जोरदार पाऊस झाला हा पाऊस म्हणजे अतिवृष्टीच होती.जोरदार झालेल्या पावसाने पाण्याचा मोठा प्रवाह हिरो शोरूमच्या तळमजल्यात शिरला.या ठिकाणी शोरूमचे विक्रीसाठी आणलेली नवी कोरी दुचाकी वाहने तसेच दुरूस्तीसाठी ग्राहकांनी आणलेली दुचाकी वाहने, यासोबत शो-रूम मधील इतर उपयुक्त साहित्य यांचे ही मोठे नुकसान झाले आहे.हे नुकसान अंदाजे 28 ते 30 लाख रूपयांचे आहे.

―शरद नागोराव लोमटे, संचालक,ॠषी एजन्सीज (हिरो शो-रूम).


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.