अंबाजोगाई तालुका

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ; ‘मानवाधिकार संरक्षणात शासनाची भूमिका' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासञ

अंबाजोगाई दि.१३ (प्रतिनिधी): येथील म.शि.प्र. मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर) व महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवाधिकार संरक्षणात शासनाची भूमिका" या विषयावर एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सोमवार,दि.18 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध अभ्यासक व संशोधक प्रा.बाल गुंडाजी पाटील हे करणार आहेत.तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, बीड येथील उपाध्यक्ष मनोजकुमार नवासे हे विचार व्यक्त करणार आहेत.या चर्चासत्राचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते होणार आहे.या उद्घाटन समारंभास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील,डॉ.नरेंद्र काळे,वसंतराव मोरे हे उपस्थित राहणार आहेत.तसेच उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून म.शि.प्र.मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर राहणार आहेत.राष्ट्रीय चर्चासत्रातील प्रथम सत्रामध्ये साधन व्यक्ती म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्याय अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.नवनाथ अघाव हे विचार करणार असून अध्यक्षपद प्राचार्य डॉ.श्रीराम येरनारकर हे भूषविणार आहेत.दुसर्‍या सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ. महादेव गव्हाणे तर सत्राध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.व्ही.एन.इंगोले असणार आहे.या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्रमुख रमेशराव आडसकर हे भूषविणार असून यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ विचारवंत व राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक डॉ.भुषणकुमार जोरगुलवार हे आपले विचार व्यक्त करणार आहेत.या समारंभास महाविद्यालय विकास समितीचे सन्माननिय सदस्य माजी प्राचार्य डॉ.आण्णासाहेब जाधव,प्रा.श्रीपती जोगदंड,सय्यद पाशु करीम,अमर देशमुख, रणजीत लोमटे यांची उपस्थिती राहणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी बीड जिल्ह्यातील सामाजिक, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांनी, संशोधकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या व चर्चासत्राच्या मुख्य संयोजक डॉ.वनमाला गुंडरे तसेच चर्चासत्राचे सह-समन्वयक डॉ.दिनकर तांदळे,डॉ.डी.बी.तांदुळजेकर, डॉ.ए.बी.बरूरे यांनी केले आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.