जालना दि.१२:आठवडा विशेष टीम― जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील व्यंकटेश नगर येथील 33 वर्षीय पुरुष, मोदीखाना परिसरातील 76 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला असे एकुण 4 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 12 जुन 2020 रोजी 7 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 चा एक जवान, अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला परिसरातील 5, जालना शहरातील जयनगर परिसरातील 1 अशा एकुण 7 व्यक्तींचा समावेश आहे.
जालना शहरातील शंकर नगर परिसरातील रहिवाशी असलेला 42 वर्षीय पुरुष दि. 5 जुन 2020 रोजी फुप्फुसाचा जंतुसंसर्ग व ह्रदयाचा आजार असल्या कारणाने त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यावस्थ परिस्थितीत आय.सी.यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधिताच्या स्वॅबचा अहवाल दि. 6 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि. 11 जुन 2020 रोजी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण – 3237 असुन सध्या रुग्णालयात -74, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1239, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 147, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3688, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 07 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -255, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3271, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-381, एकुण प्रलंबित नमुने -158, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1157,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 08, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 1047, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -18, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -576, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 74, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -42, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-04, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -149, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 93, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 7704, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 576 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 28, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -23, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -305, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-12, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 28, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –08, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -21, मॉडेल स्कुल मंठा-39,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 167 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 792 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 32 हजार 630 असा एकुण 3 लाख 59 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.