माजलगाव:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीने अधिकाऱ्यांना मॅनेज करून कापूस अाणी तुरीच्या पिकविम्यापासून वंचित ठेवले असा आरोप शिवसंग्रामचे युवा नेते इंजि. अक्षय शिंदे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात मागच्या वर्षी कापूस आणी तूर या पिकाची भरपूर प्रमाणात लागवड करून शेतकऱ्यांनी कापूस आणि तुर या पिकांचा पीकविमा भरलेला होता. अगदी जोमाने आलेलं पीक परतीच्या आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की आपला नुकसान झालेल्या कापूस आणी तूर या पिकांचा पीकविमा मिळू शकतो पण पीकविमा कंपनीने फक्त तीळ या पिकाचा पीकविमा मंजूर करून जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस आणी तूर या पिकविम्यापसून वंचित ठेवले. यात अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी दराडे यांच्याकडे विचारणा केली असता उंबरठा उत्पन्न पेक्षा जास्त उत्पन्न आल्यामुळे पीकविमा मंजूर झाला नाही अशी उत्तरे पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी देत आहेत. पण यात अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील अधिकारी आणि पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांना मॅनेज करून खोटे अवहाल देऊन माजलगाव तालुका पिकविम्यापासून वंचित ठेवला आहे. लवकरात लवकर मा. जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने अा.विनायकराव मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे युवा नेते इंजि.अक्षय शिंदे तसेच उत्तम बप्पा पवार, रामेश्वर गवळी, गोविंद शिंदे यांनी दिला आहे