परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

भाजपाचे निळंकठ चाटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत परळीतील शासकीय कार्यालय स्यानिट्यईझ निर्जंतुकीकरण फवारणी

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― येथील भाजयुमोचे निळंकठ चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत आज शनिवार, दि.13जून रोजी परळी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात स्यानाट्यईझ निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी कोरोना प्रतिबंध म्हणून स्यानाट्यईझ निर्जंतुकीकरण करण्यात आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिशय सतर्कता घेतली जात आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. राज्यभरात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. फिजीकल डिस्टन्स पाळून सर्व व्यवहार पार पाडले जात आहेत. विविध माध्यमांतून या बाबतीत जनजागृती केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आज शनिवार, दि.13 जून रोजी परळीतील तहसील,पोलीस स्टेशन शहर व संभाजीनगर, कृषी कार्यालय तसेच सर्व शासकीय कार्यालयात भाजयुमोचे युवा नेते निळंकठ चाटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्यानाट्यईझ निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
    कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या अनुषंगाने निर्जंतकीकरण करण्यासाठी, स्यानाट्यईझ निर्जंतुकीकरण जंतुनाशक फवारणी करून निळंकठ चाटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. चाटे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मोफत जिवनाश्यक किटचे वाटप करण्यात आले आहे. ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात म्हणून ते सामाजिक जाणीवतेच्या माध्यमातून गोरगरीबांच्या मदतीला नेहमीच धावून येतात. यावेळी परळीतील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.