औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसोयगाव तालुकाहेल्थ

सोयगाव: आरोग्य कर्मचाऱ्यांचे वाहन फसले ,सावरखेडा घाटातील घटना

सोयगाव,दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या तपासणीसाठी व सर्वेक्षणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी सावरखेडा(ता.सोयगाव)येथे घेवून जात असतांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाचे चक्क रुग्णवाहिकाच सावरखेडा घाटात फसल्याने या कर्मचाऱ्यांना भर पावसात रस्त्यावर उभे राहावे लागले होते.अखेरीस रुग्णवाहिकेच्या चालकाने शेजारील मजुरांच्या सहाय्याने चार तासांच्या अथक परिश्रमाने घाटात अडकलेले वाहन बाहेर काढल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांना घेवून रुग्णवाहिका सावरखेड्याला निघाली होती.
सोयगाव तालुक्यातील सावरखेडा ता.सोयगावला कोरोना बाधितांची संख्या तीनवर पोहचली असल्याने या गावात नियमित आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम तालुका आरोग्य विभागाने घेतले आहे.तसेच या गावात होमकोरोटाईन करण्यात आलेल्या रुग्णांच्या उपचाराची औषधी या रुग्णवाहिकेतून सावरखेड्याला घेवून जात असतांना अचानक दरड कोसळलेल्या घाटात आरोग्य विभागाची रुग्णवाहिका घाटात फसल्याने मोठा गोंधळ उडाला होता.घाटात फसलेली रुग्णवाहिका मात्र घाटाच्या संरक्षण भिंतीच्या कडेला झुकल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी घाबरगुंडी उडाली होती.मात्र चालकाने शिताफीने रुग्णवाहिका नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला होता.अखेरीस बाजूच्या शेती शिवारातून काही मजुरांना घटनास्थळी पाचारण करण्यात येवून चार तासांच्या परिश्रमाने हि रुग्ण वाहिका सावरखेड्याला रवाना करण्यात आली होती.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.