पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते ढाळेवाडी या ६ कि.मी. रस्ता अंदाजे किंमत ३ कोटी २२ लाख रुपये काम पूर्ण न करताच निधी उचलून काम पुर्णत्वाचा दि.२३/०८/२०१९ रोजी असा फलक पी.व्हि.पी.कालेज समोर लावला आहे.
ढाळेवाडी,आरणगाव ग्रामस्थांना बाजारहाट तसेच मुलांना शाळेसाठी पाटोदा येथे जावे लागत असल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ ठेकेदाराने करावे अशी मागणी केली आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:
मुख्यमंत्री ग्राम सडक विकास संस्था बीड येथिल कार्यकारी अभियंता श्री बेंद्रे यांच्या आशिर्वादाने कनिष्ठ अभियंता जोगदंड व ठेकेदार डोंगरे यांनी संगनमताने शासकीय निधीचा अपहार केला असुन केवळ पाटोदा शहरातील अर्धा कि.मी.सिमेंट रस्ता केला आहे, पुढे न्याय मंदिरासमोरील रस्ता चिखलाने बरबटला असुन नागरीकांना रहदारीसाठी अडचण येत आहे. या अपहार प्रकरणी चौकशी करून शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रस्ते विकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.