यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन
अंबाजोगाई (प्रतिनिधी):”वार्षिक स्नेहसंमेलनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असतो. ज्यांना स्वप्न पडत नाहीत.ते कसले तरुण. तरुणांनी नेहमीच प्रत्येक आव्हाणांना सामोरं गेलं पाहिजे. धाडसी पोरं कुठं ना कुठं चमकणारच.सगळ्याच क्षेत्रात कुशल मनुष्यबळ पाहिजे.तेंव्हा विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे करीयर म्हणून पहावं.मेहनत करा,निर्व्यसनी रहा,जे करायचं ते मनापासून प्रामाणिक राहून निष्ठेने करा,कुटूंब आणि देशावर प्रेम करा, आई -वडील -गुरूजनांचा आदर राखा,चांगुलपणा जोपासा,कोणत्याही क्षेञाला कमी न समजता स्वबळावर उद्योजक,मालक व्हा पोरं हो,मोठ्ठे व्हा,”असा मौलिक संदेश स्नेहसंमेलन सोहळ्याचे प्रमुखपाहुणे म्हणून बीड जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बुधवार,दि.13 फेब्रुवारी
रोजी विचारमंचावर अध्यक्षस्थानी वसंतराव मोरे,प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बाबासाहेब गोरे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे,प्राचार्य डॉ. अण्णासाहेब जाधव,
उपप्राचार्य प्रा.के.डी. गाडे,उपप्राचार्य दिनकर तांदळे उपप्राचार्य भगवानराव शिंदे, डॉ.वसंत उंबरे व
स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन करुन व लोकनेते यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमापुजन करुन स्वागतगिताने झाली. प्रा.सारीका जोशी यांनी स्वागतगीत गायिले.या वेळी बोलताना प्राचार्य बाबासाहेब गोरे यांनी
समयसुचकतेने विद्यार्थ्यांच्या अंगी विनोदबुद्धी असायला हवी असे सांगीतले.तर आपल्या कणखर वाणीतुन त्यांनी विद्यार्थ्यांनी तणा सोबतंच मनाचाही विकास करावयाला हवा असे नमूद केले.
कार्यक्रमाचे समायोचीत प्रास्ताविक प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी केलं.कार्यक्रमात मागिल चार दिवसांत आयोजित वाङमय मंडळ,क्रिडा मंडळ,सांस्कृतिक मंडळ,संगीत विभाग व स्नेहसंमेलातील सर्व स्पर्धा आणि गुणवंत, यशवंत विद्यार्थी पुरस्कार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या सर्व पारितोषिक वितरणांचे कार्य प्रा़.डॉ. दिलीप भिसे,प्रा. तत्तापुरे,प्रा.टी.एन चव्हाण आणि प्रा. अनंत मरकाळे यांनी केले.कार्यक्रमाचा बहारदार सूत्रसंचालन प्रा.केशव हंडीबाग यांनी करून उपस्थितांचे आभार वार्षिक स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांनी मानले. वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता स्नेहभोजनाने झाली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक,कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला.