औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: रस्त्यावरील आडवे झाड न दिसल्याने मेणगाव फाट्यावर अपघात कंकराळा येथील दोघे गंभीर जखमी

सोयगाव,दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव-बनोटी रस्त्यावर वादळी वाऱ्याच्या तडाख्यात आडवे पडलेले झाड न दिसल्याने समोर समोर येणाऱ्या दोन मोटार सायकलींचा जबर अपघात रविवारी सायंकाळी मेणगाव फाट्यावर घडला आहे.या अपघातात मोटारसायकलस्वर दोघे गंभीर जाक्म्ही झाले असून त्यातील एकाला जळगावला रवाना करण्यात आले आहे.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर झाड आडवे पडले आहे.सार्वजनिक विभागाकडून अद्यापही हे झाड रस्त्यावरून हटविण्यात आलेले नसून या झाडाच्या आडव्या फांद्या न दिसल्याने धोंडू लव्हाळे हे सोयगाव कडून मोटारसायकल क्र-एम-एच-२० २९३६ वरून कंकराळा गावाकडे जात असतांना व कंकराळा गावाकडून सोयगावकडे येत असणारे शुभम उबाळे मोटारसायकल क्र-एम-एच-२० ९२१८ या दोघांचा समोरासमोर अपघात झाला असून दोघेही कंकराळा ता.सोयगाव येथील रहिवासी आहे.या अपघातात धोंडू लव्हाळे यांच्या मेंदूला जबर मार बसला असून त्यांना तातडीने जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या दोघांवर सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.अपघातस्थळी सुनील पाटील,जीवन उबाळे ,शाम पाटील,आदींनी मदतकार्य करून तातडीने जखमींना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.