घराच्या खोदकामात सापडल्या विठ्ठल रुखमाईच्या मुर्त्या ,गलवाडा येथील घटना

सोयगाव,दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
वेताळवाडीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या गलवाडा ता.सोयगाव येथे घराचे खोदकाम करत असतांना सहा फुट खोलवर विठ्ठल रुखमाईच्या मुर्त्या सापडल्याची घटना गलवाडा ता.सोयगाव येथे रविवारी दुपारी उघडकीस आली आहे.या मुर्त्या सापडताच ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गलवाडा ता.सोयगाव येथे घरकुल लाभार्थी शारदाबाई बावस्कर यांच्या घराचे काम सुरु असतांना रमेश सोनवणे हे मजुरांच्या सहाय्याने घराचा पाया खोदत असतांना अचानक पाच फुटावर त्यांना काही समाधीचे अवशेष हाती आले परंतु त्यांनी पुन्हा खोलवर खोदकाम हाती घेतले असतांना त्यांना दगडाच्या अतिप्राचीन कोरीव मुर्त्या असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांनी मूर्तीच्या आकाराच्या अवतीभोवती पुन्हा खोदकाम करून अखेरीस विठ्ठल रुखमाईच्या मुर्त्या बाहेर काढल्यावर गावात मुर्त्या सापडल्याच्या वार्ता पसरताच ग्रामस्थांनी अखेरीस दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.जमिनिबाहेर मुर्त्या काढल्यावर रमेश सोनवणे यांनी या मूर्तीला दुग्धाभिषेक करून वाजत गाजत गावाच्या मंदिरासमोर आणल्या,मूर्ती सापडल्याने गलवाडा गावात मात्र आनंदोस्तव साजरा करण्यात आला होता.

ग्रामस्थांच्या बैठकीतून ठरणार प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त-

गावात विठ्ठल रुखमाईच्या प्राचीन मुर्त्या सापडल्यानंतर ग्रामस्थांनी रविवारी रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत मुर्त्यांचे प्राण प्रतिष्ठेचे मुहूर्त ठरविण्यात येणार आहे.

गावात कोरीव दगडी मुर्त्या सापडल्याची वार्ता कळताच रमेश सोनवणे,सुशीलाबाई सोनवणे,जितेंद्र सोनवणे,अनिल इंगळे,दत्तू इंगळे,भारत तायडे,जीवन पाटील आदींनी मुर्त्यांची मंदिरासमोरील ओट्यावर मांडणी करून ग्रामस्थांना दर्शनासाठी खुल्या करून दिल्या होत्या.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.