जळगाव जिल्हा

हनुमंतखेडा येथे गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त

बनोटी (ता.सोयगाव) हातभट्टी अड्डा साहीत्य जप्त करतांना पोलीस

बनोटी, ता. १२ (प्रतिनिधी): हनुमंतखेडा (ता.सोयगाव) येथे सोमवारी सोयगाव पोलीसांनी टाकलेल्या धाडीत चारशे पन्नास रुपयाची अवैध दारू दारू जप्त करुन गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. दोन आरोपींवर बनोटी दुरक्षेत्रात गुन्हा दाखल.
हनुमंतखेडा शिवारातील शेतात हातभट्टी दारू तयार केली जाते, तसेच अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहीती सरपंच दादाभाऊ चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम पाटील, पोलीस पाटील नंदकिशोर पाटील यांनी बनोटी पोलीसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी माहीती च्या आधारे सोमवारी या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यावेळी आरोपींनी लावलेली एक हातभट्टी व हातभट्टी तयार करण्याचे द्रव्य, सामग्री मिळून आली. नवसागर मिसळलेला गुळाचा वॉश, गावठी हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने, ६०० लिटर गावठी दारू, २०० लिटर क्षमतेच्या चार टाक्या असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला.दुसऱ्या कारवाईत हनुमंतखेडा चौफुलीजवळील शेतात अवैध दारू विक्री करणाऱ्यास ताब्यात घेऊन आठ देशी दारूच्या बाटल्या किंमत एकूण चारशे पन्नास रुपयाचा माल जप्त करण्यात आल्या या कारवाईच्या अनुषंगाने बनोटी दुरक्षेत्रात आरोपी अशोक माणिक वाघ (वय ४४),एकनाथ रामसिंग राठोड (वय ३६)दोघे रा. हनुमंतखेडा यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख शकील, ठाणे अंमलदार सुभाष पवार, दिपक पाटील, कौतीक सपकाळ, सरपंच दादाभाऊ चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम पाटील,ग्रामसेवक अनिल पवार, पंढरी राठोड, अंकुश राठोड आदींकडुन करण्यात आली.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.