लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे दि. १२/०६/२०२० वार शूक्रवार रोजी दूपारी १ वाजता आलेल्या मुसळधार पावसाने वायभट वस्ती, गिरे वस्ती, जाधव वस्ती, मुळे वस्ती, रणखांब वस्ती, यांचा ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आलं.यामुळे गावाशी संपर्क तुटला आहे.
स्थळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी–डॉ.गणेश ढवळे
ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस आल्यामुळे सर्व परिसरात पाणीच पाणी झाले, शेतामध्ये पाणी न मावल्यामुळे बांध फुटले आहेत. त्यामुळे बांधबंदिस्तचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच पेरलेले बि-बियाणे , शेणखत, व लागवड केलेली रोपे याबरोबरच शेतातील माती सुद्धा वाहुन गेली आहे.तरी संबंधित प्रकरणी महसुल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.