बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत सोमवारी ३ ने भर पडली,दुपारी गेवराई,नंतर सिरसाला आणि संध्याकाळी बार्शीनाका भागातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे .या ३ मृत्यूमुळे एकूण कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या १७ झाली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या साडेतीनशे च्या पार गेली असून यात बीड,परळी,केज,गेवराई या भागातील रुग्ण जास्त आहेत,त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील गेल्या चार पाच दिवसात वाढले आहे.
गेवराई येथील ३२ वर्षीय महिलेचा दुपारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तर औरंगाबाद येथे उपचार घेणाऱ्या सिरसाला येथील एका शिक्षकाचा एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला होता.
दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बार्शीनाक भागात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या तीन मृत्यूमुळे बीड जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची संख्या १७ एवढी झाली आहे.