बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजरस्ते अपघातलिंबागणेश सर्कल

Updated बीड : मुळुकफाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार

लिंबागणेश दि.१५:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे मुळुक पुलाजवळ अपघात झाला आहे.अपघातात २ ठार आणि १ गंभीर जखमी व्यक्ती मृत घोषित करण्यात आला आहे.
अपघातात ठार व्यक्ति १) संजय बाळु सोनावणे वय ३५ वर्षे , २) बंकट बाबु मोरे वय ४५ रा. मसेवाडी ता.बीड जि बीड. आणि गोरख बबन मोरे वय ३२ हे गंभीर जखमी होते.पोलिस प्रशासनाने जखमींना लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते व जखमीला मृत घोषित करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की,

 1. गोरख बबन मोरे वय ३० वर्ष अविवाहित , व्यवसाय शेती ,पश्चात आई, वडील, १ भाऊ ,१ बहिण
 2. बंकट बाबूराव मोरे वय ५० वर्षे विवाहित ,१ मुलगा व १ मुलगी त्यांची लग्न झालेली आहेत वडील आहेत,आई हयात नाही.
 3. संजय बाळु सोनवणे वय ४० वर्षे विवाहीत २ मुली वय ११ वर्षे आणि ७ वर्षे ,१ मुलगा बालवाडीत

यापैकी दोघे गोरख बबन मोरे आणि बंकट बाबूराव मोरे हे लग्न समारंभांवरून मोटार सायकल वरुन गावी मसेवाडी येथे परत येत होते.

लिंबागणेश याठिकाणी संजय बाळु सोनावणे यांची भेट झाली. चहापाणी झाल्यावर तिघेही एकाच मोटार सायकल वर बसुन मसेवाडी कडे निघाले वेळ दुपारी पावने दोन च्या सुमारास मुळुक गावाजवळ पुलाजवळ बीड येथुन पांढऱ्या स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली. यात स्विफ्ट कार दोन पलटी खाऊन रस्त्याच्या बाजुला पडली. मोटार सायकल वरील बंकट बाबुराव मोरे व संजय बाळु सोनावणे जागीच ठार झाले.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  तिसरा गंभीर अवस्थेत लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठीकाणी तपासणी केल्यानंतर डॉ.रूपाली राऊत वैद्यकीय अधिकारी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी जखमी गोरख बबन मोरे यांना मृत घोषित केले.

  घटना स्थळावर नेकनुर पोलिस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि त्यांची टीम व लिंबागणेश येथिल पोलिस चौकीतील कर्मचारी उपस्थित होते.
  सध्या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टमच्या तयारीत आहेत. सध्या पोलीस कर्मचारी मृत व्यक्ती वरील जखमा आदि.ची नोंद करत आहेत.

  स्विफ्ट गाडीतील दोघेही मद्यधुंद अवस्थेत आहेत. नेकनुर पोलिस ठाणे येथे त्यांना नेण्यात आले आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.