सोयगाव,ता.१३:ऐन दुष्काळात सोयगाव तालुक्यात निर्माण झालेल्या जनावरांच्या चारा व पाणी टंचाईची पाहणी करण्यासाठी पशुसंवर्धन आणि तहसीलच्या पथकांनी तालुकाभर चारा टंचाईच्या पाहणी दरम्यान बोरमाळतांडा(ता.सोयगाव)येथील गोशाळेत चाऱ्याअभावी व पाण्याअभावी होरपळनाऱ्या जनावरांची पाहणी करून या गोशाळेत असलेल्या पाचशे साठ गायी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्यासाठी जवळच असलेल्या लघुसिंचन तलावातील पाण्याचा उपसा करून जनावरांसाठी खुले करून दिल्याने या गोशाळेतील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.
दरम्यान बोरमाळतांडा(ता.सोयगाव)गोशाळेत पाचशे साठच्यावर जनावरे महिनाभरापासून चारा व पाण्याअभावी होरपळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सोयगाव तहसील कार्यालयात केल्यावरून तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तातडीने पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक महाजन यांच्यासह पथकाची भेट देवून जवळील लघुसिंचन तलावातील पाणी जनावरांच्या पिण्यासाठी उपयोगात आणण्याबाबत पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता सुनील राठोड यांना देवून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.दरम्यान पाण्याच्या व्यवस्थेसोबतच जनावरांच्या चाऱ्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून एक क्विंटल मका बियाणे पेरणीसाठी देण्यात आल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
दरम्यान सोयगावकडून बोरमाळतांडा जात असतांना तहसीलदार प्रवीण पांडे यांना चारा वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यातच आढळल्याने सदरील वाहन तहसीलदार सोयगाव यांनी गोशाळा बोरमाळ तांडा येथे खाली करून या जनावरांना त्वरित चारा उपलब्ध