कोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग: सावंतवाडी येथील ७० वर्षीय कोरोना बाधीत वृद्धाचा मृत्यू , जिल्ह्यात एकूण ५५ सक्रीय रुग्ण

सिंधुदुर्गनगरी दि.१५:आठवडा विशेष टीम― सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 अशी झाली आहे. सदर वृद्ध हा दिनांक 10 जून 2020 रोजी मुंबई येथून आला होता. त्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, श्वसनदाह असे आजार होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 झाली आहे. तर जिल्ह्यात आजमितीस 55 सक्रीय रुग्ण आहेत.

    • पाठविण्यात आलेले एकूण नमुने - 2,976
    • अहवाल प्राप्त झालेले नमुने- 2, 901
    • आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने - 154
    • निगेटीव्ह आलेले नमुने- 2,747
    • अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 75
    • सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण - 55
    • इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण-1 (मुंबई)
    • मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 4
    • डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण - 94
    • विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - 84
    • आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 4,197
    • संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 17,927
    • शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती - 146
    • गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 15,968
    • नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 1,813
    • दि. 2 मे 2020 रोजीपासून आतापर्यंत जिल्ह्यात दाखल व्यक्ती - 96,172

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.