सोयगाव-बनोटी रस्त्यावरील अवैध वृक्षतोडीवर महसूलची कारवाई,वनविभागाकडे कारवाईसाठी सुपूर्द

सोयगाव,ता.१३:बनोटी वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बोरमाळ तांडा शिवारातील रस्त्यावर सर्रास सुरु असलेल्या अवैध वृक्षतोडीवर तहसीलदार प्रवीण पांडे यांनी बुधवारी कारवाई करून संबंधित तोड झालेल्या डेरेदार वृक्षांची लाकडे बनोटी वनविभागाच्या ताब्यात कारवाईसाठी पंचनामा करून दिली आहे,दरम्यान बनोटी मंडळातील अवैध वृक्षतोडीवर महसूल विभागाने कारवाई केल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
बनोटी वनपरिमंडळात अनेक दिवसापासून डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरु आहे.याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने या प्रकारात वाढ झाली आहे.दरम्यान बुधवारी तहसीलदार सोयगाव यांचा बनोटीकडे असलेल्या पाहणी दौऱ्यात बोरमाळ तांडा शिवारात डेरेदार वृक्षांची जोरदार कत्तल सुरु असल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आल्यावरून त्यांनी या घटनेचा पंचनामा करून कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.डेरेदार वृक्षांची या भागात मोठ्या प्रमाणावर तोड सुरु असून यावर प्रतिबंध घालण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *