दमदार आमदार बाळासाहेब आजबे यांची शानदार कामगिरी मतदारसंघातील शाळेच्या विकासासाठी मंजूर करून आणले कोट्यावधी
पाटोदा:गणेश शेवाळे― आष्टी पाटोदा शिरूर मतदासंघातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी कोट्यावधी रुपय जि.प मधून मंजूर करून घेतले तसेच पाटोदा तालुक्यातील डोगरकिन्ही येथील जि.प शाळा विकासा पासून अनेक वर्षे लाब होती माञ बीड जिल्हाचे दबंग पालकमंञी धनंजय मुंडे व आष्टी मतदारसंघाचे दमदार आमदार बाळासाहेब आजबे यांनी जिल्हा परिषद ताब्यात येताच डोगरकिन्ही गटातील लोकांचे आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित दादा पवार साहेब यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे डोंगरकिन्ही करांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या जि.प शाळेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करून आणले असून लवकरच शाळेच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे . यामुळे डोंगरकिन्ही करांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून दमदार आमदार बाळासाहेब आजबे यांनी शानदार कामगिरी केल्यामुळे डोंगरकिन्ही गटाच्या वतिने आमदार आजबे यांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा मराठवाडा रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष रुपेशराजे बेद्रेपाटील यांनी मानले आहेत.