लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी या मार्गावरील मुळुक व लिंबागणेश ,वैद्यकिन्ही गावात गतिरोधक🚸 बसविण्याची मागणी मुळुक सरपंच कृष्णा पितळे , व डॉ.गणेश ढवळे यांनी नितिन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली असुन. काल ३ शेतक-यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर मागणीला जोर आला आहे.
कृष्णा पितळे , सरपंच मुळुक―
मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गामुळे गाव दोन भागात विभागले गेले असुन शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागते, त्यामुळे अपघात होण्याची भिती जास्त आहे,कारण दुभाजक नसल्याने वाहने गावातून जाताना वेगाने जातात.
राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, ४ महीन्यापुर्वी या रस्त्याचे अभियंता अमित कुमार यांना ग्रांमपंचायतने लेखी ठराव आणि निवेदन दिले आहे.
सचिन वाणी , शिक्षक भालचंद्र महाविद्यालय―
लिंबागणेश येथिल भालचंद्र महाविद्यालयात परीसरातील १२ वाढल्याचे जवळपास १०००, विद्यार्थी-विद्यार्थिनी🚸 असुन रहदारीच्या वाढत्या काळात शाळेपाशी तात्काळ गतिरोधक बसवणे अत्यावश्यक आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते―
लिंबागणेश हे आठवडी बाजाराचे गाव असुन गुरूवारी परिसरातील ग्रामस्थ व बाहेरील व्यापारी याठिकाणी येतात. सध्या सिमेंट रस्त्याचे काम झाल्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली असुन अपघाताचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मुळुक,लिंबागणेश ,वैद्यकिन्ही या गावात गतिरोधक बसवणे गरजेचे आहे त्यामुळे काल झालेल्या भिषण अपघातात बि-बियाणे घेऊन जाणा-या ३ शेतकरी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री, यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.निवेदनावर मुळूक ,लिंबागणेश ग्रांमस्थांच्या स्वाक्षरी आहेत.