बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजमांजरसुंबासामाजिक

अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यकर्त्याने व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकच तोडला , कारवाईची मागणी – डॉ.गणेश ढवळे

मांजरसुंबा:आठवडा विशेष टिम―

अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यकर्त्याने धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील नामलगाव फाट्याच्या उड्डानपुलापुढे दोन्ही मार्गावरील ग्राहक मिळावेत आणि आधिक पैसे कमावण्याच्या नादात नामलगाव फाट्यापुढील उड्डानपुलाच्या थोडं पुढे रात्रीतूनच औद्योंगिक वसाहतीच्या आडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने दुभाजकच तोडला आहे त्यामुळे त्याठिकाणी ८ जुन रोजी कार ,ट्रक आणि दुचाकी यांचा तिहेरी अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु भविष्यात नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे दुभाजक पुर्ववत करण्यात यावा आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर केली आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  दै.सकाळ सामाजिक बांधिलकी

  औरंगाबाद विभागीय बीड टुडे पान नं १ वर दि. १३ जानेवारी रोजी 'चक्क राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकच तोडला ' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताना भविष्यात अपघातात निमंत्रण दिले असून भविष्यात अपघाताची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर दि. ०८ जुन २०२० रोजी या तोडलेल्या दुभाजकामुळेच कार , ट्रक आणि दुचाकी यांचा तिहेरी अपघात झाला होता, नशिबाने जिवितहानी झाली नाही. परंतु भविष्यात नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

  दुभाजक पुर्ववत करावे, जिवितहानी झाल्यास हाटेल मालक व अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ― डॉ.गणेश ढवळे

  या प्रकरणी चौकशी करून तोडलेले दुभाजक पुर्ववत करण्यात यावे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जिवीताशी खेळणा-या हाटेल मालक व अधिकारी यांच्यावर भविष्यात दुभाजक तोडल्यामुळे या ठिकाणी अपघाताने जिवितहानी झाल्यास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी लेखी तक्रार नितिन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार ई-मेलद्वारे पाठवली आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.