बीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

पत्रकार पोपट कोल्हे यांच्या वरिल खोटा गुन्हा मागे घ्या

आष्टीच्या पत्रकारांनी दिले तहसीलदारांना निवेदन

आठवडा विशेष | प्रतिनिधी
आष्टी: बीड जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असून त्यातच पाटोदा तालुक्यात टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या पाणी टंचाई विषयी बातमी छापल्याने पाटोदा येथील तहसीलदार यांनी या बातमीचा राग धरून दैनिक चंपावती चे पत्रकार पोपट कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार म्हणजे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. पत्रकार पोपट कोल्हे यांच्यावर आकसबुद्धीने केलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन आष्टीचे तहसीलदार हिरामण झिरवाळ यांना दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे, प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे, उत्तम बोडखे, दत्ता काकडे, शरद तळेकर, अविनाश कदम, विनोद ढोबळे,बा. म. पवार, निसार शेख, रघुनाथ कर्डिले, अविशांत कुमकर ,जावेद पठाण, नितीन कांबळे, गणेश दळवी, बापूराव गुरव, शरद रेडेकर, सचिन रानडे,अण्णा साहेब साबळे, संतोष तागडे, यशवंत हंबर्डे, किशोर निकाळजे, मुज्जाहिद्द सय्यद, अनिरुद्ध धर्माधिकारी, गोपाळ वर्मा, कृष्णा पोकळे, तुकाराम भवर, रतन निकाळजे, अंकुश तळेकर, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, अशोक तळेकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.