जळगाव जिल्हापाचोरा तालुकाविशेष बातमी

जळगाव: पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा नजिक प्रेमीयुगुलाची किटनाशक पिऊन आत्महत्या

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा पी. जे. रेल्वेच्या मोठ्या पुलाकडे जाणाऱ्या मार्गा जवळील शेताजवळ एका ३५ वर्षीय पुरूष व ३० वर्षीय महिलने कीटकनाशके औषधे प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दि.१७ जून बुधवार रोजी दुपारी एक वाजेपुर्वी गोराडखेडा पाचोरा – जामनेर रेल्वे गेट पासून मोठ्या रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील शंभर मीटर अंतराच्या अलीकडे ३५ वर्षीय उमेश हरी शेळके वय अंदाजे ३५ व ३० वर्षीय पिंकी (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शेतीसाठी वापरले जाणारे विषारी किटक नाशक औषधी घेऊन आत्महत्या केल्याचे जवळील एका शेतकऱ्याला दिसून आले. घटनेची माहिती गोराडखेडा येथील माजी सरपंच मनोज पाटील व संजय पोलिस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना कळवली.मयतांच्या गळ्यात झेंडूच्या फुलाच्या मळा आहे. बाजुला किटक नाशक औषधीचा डब्बा व प्लास्टिकचे डिसपोजल ग्लास पडलेले होते. मयत पुरुष व महिला रा. घाणेगाव तालुका सोयगाव, जि.औरंगाबाद येथील असल्याचे मयत इसमाच्या पाचोरा येथील एक महिला नातेवाईकांकडून माहिती मिळाली आहे. दोघ मयतांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत पुरूष हा शेतीकाम करीत असल्याचे व विवाहीत असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण पोलिस चौकशीनंतरच निष्पन्न होणार आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.