पाटोदा:गणेश शेवाळे― भारतीय लष्करावर भ्याड हल्ला करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी आमदार सुरेश धस मिञ मंडळाच्या वतिने चिनी वस्तूवर बहिष्कार आंदोलन करुन चिनी वस्तु खरेदी करुन नये म्हणून पुतळा जाळुन निषेध करण्यात आला याबाबत कि. भारतीय लष्करावर भ्याड हल्ला चीनने केला असुन यामध्ये भारतीय जवान शहिद झाले असुन या निषेर्धाथ पाटोदा नगरपंचायतसमोर या शहिदाना श्रद्धाजंली वाहण्यात आली तसेच यापुढे चिनी वस्तू वापरायच्या नाहीत त्याचप्रमाणे यावेळी चिनी वस्तुचा पुतळा करुन जाळण्यात आला.व निषेध करण्यात आला यावेळी प्रथम नगराध्यक्षपती बळीराम पोटे,माझी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण,नगरसेवक संदीप जाधव,सभापती आसिफ सौदागर,सभापती राजु जाधव,बापु नवले सह आदीजण होते.