औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यरोजगारविशेष बातमीसोयगाव तालुका

लॉकडाऊन मध्ये काळी-पिवळी टॅकसी चालंकावर बेकारीची कुऱ्हाड ,सोयगावला निवेदन

सोयगाव,दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या लॉकदावून मध्ये अडकलेल्या काळी-पिवळी टॅकसी चालकांवर तीन महिन्यापासून बेकारीची कुऱ्हाड कोसळली असतांना लॉकडाऊनच्या नियमात झालेल्या शिथिलते बाबत कोणताही निर्णय शासन पातळीवर घेण्यात आला नसल्याने काळी-पिवळी टॅकसी चालकांना मासिक पंधरा हजार रु मदत करण्यात यावी याबाबतचे निवेदन गुरुवारी मराठवाडा टॅकसी युनियन संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोयगावला तहसीलदार प्रवीण पांडे देण्यात आले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे,कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनच्या काळात टॅकसी चालकांची मोठी उपासमार झाली असतांना लॉकडाऊनच्या शिथिलतेच्या काळात कोमातही निर्णय न घेता पुन्हा निर्बंध घालण्यात आले असल्याने शासनाकडून काळी-पिवळी टॅकसी चालकांवर अन्यायकारक भूमिका लादण्यात आली आहे.याबाबतच्या निर्णयावर फेर निर्णय घेवून प्रवाशी संख्येत वाढ करावी अन्यथा या काळी-पिवळी टॅकसी चालकांना मासिक पंधरा हजार रु मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.