अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्णरत्न पुरस्काराचे 23 फेब्रुवारी शनिवार रोजी वितरण

पत्रकार प्रशांत बर्दापुरकर,समाजसेवक ओमप्रकाश गिरी, शिक्षक मुजीब काझी, शाहीर तुकाराम ठोंबरे यावर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी

आठवडा विशेष|प्रतिनिधी

अंबाजोगाई : येथील संकल्प विद्या प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या "सुवर्णरत्न" पुरस्काराचे वितरण यावर्षी शनिवार,दि.23 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.यावर्षी हे पुरस्कार प्रशांत बर्दापुरकर (पत्रकारिता) ओमप्रकाश गिरी (सामाजिक) ,मुजीब काझी (शिक्षण) शाहीर तुकाराम ठोंबरे (कला) यांना जाहिर झाले आहेत.तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्यवाहक प्रा.कैलास भागवत चोले यांनी केले आहे.

येथील संकल्प विद्या प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना दरवर्षीच सुवर्णरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी 23 फेब्रुवारी शनिवार 2019 रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सोबतच एस.बी.एस.स्कूल चा सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून किरणकुमार गित्ते (आयुक्त,पी.एम.आर.डी.ए.पुणे) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे(सभापती,पाणी पुरवठा समिती न.प. अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून केशवदादा आंधळे (माजी आमदार, चौसाळा), दगडूदादा लोमटे (सामाजिक कार्यकर्ते), संतोष गर्जे (सामाजिक कार्यकर्ते), रघुनाथ जगताप (संस्थापक अध्यक्ष, संध्या मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडीट सोसायटी), चंदन कुलकर्णी (विस्तार अधिकारी, ग.शि.का. अंबाजोगाई) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी प्रशांत बर्दापुरकर, ओमप्रकाश गिरी,मुजीब काझी,शाहीर तुकाराम ठोंबरे या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्णरत्न पुरस्कार-2019 देवून सन्मानित करण्यात येणार आहे.दिनांक 23 फेब्रुवारी 2019 शनिवार रोजी दुपारी 1 वाजता मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.रेखाताई सुभाष बडे, उपाध्यक्षा सौ.रत्नमाला अशोक लांब,सचिव प्रा.कैलास भागवत चोले,शाळेचे मुख्याध्यापक शेख एम.एम.सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.जयश्री सुग्रीव मुंडे व संकल्प परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.