पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

पैठण ते पंढरपूरच्या गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
सध्या कोरोना महामारीत गेल्या तीन महिन्यापासून लाॅकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तुचे दुकाने सोडता बाकी सर्व छोट्या इतर दुकाने बंद होती.सध्या परस्थिती नुसार प्रशासनाने दुकाने काही वेळे साठी चालु केली आहे. परंतु पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत पैठण ते पंढरपूर रस्त्याच्या काम चालु आहे.परंतु या कामाचे गुत्तेदाराचा निष्काळजीपणा पणा येथील गोरगरीब व्यापाऱ्यांच्या मुळावर आले आहे.दि.१२ रोजी दुपार नंतर झालेल्या पाऊसामुळे गटार नसल्याने थेट दुकानात पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तहसील प्रशासनाने या दुकानाचे पंचनामा करून संबंधित गुत्तेदाराकडून भरून द्यावे असे निवेदन तहसील कार्यालय पाटोदा येथे देण्यात आले आहे.यावेळी माजी सरपंच किशोर अडागळे,गोकर्ण दिघांबर,डॉ. छगन खाडे,शाहू रंधवे,डॉ. प्रेमकुमार भोंडवे,किशन भोसले,दिपक मळेकर,मुळे मंगेश उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    पाटोदा एसटी स्टँड समोर सर्व गोरगरीब व्यापारी आहे, आ.सुरेश आण्णा धस यांच्या प्रयतनाने या जागेवर नवीन रोडची हद्द सोडून छोटी छोटी दुकाने सिल्क रहायल्याने लोक दुकाने चालु केली आहे.परंतु गुत्तेदारांच्या निष्काळजीपणाणे चालेल्या कामामुळे येथील व्यापारी गेल्या सहा महीन्या पासून त्रास सहन करावे लागत आहे.तरी संबंधित गुत्तेदाराने लवकर काम करावे व दि.१२ रोजी झालेल्या पाऊसच्या नुकसान हि प्रशासनाने पंचनामे करून.गुत्तेदाराकडून नुकसान भरपाई भरून द्यावी....।
    ― किशोर अडागळे

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.