ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणराष्ट्रीय

चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ऍप टीकटॉक वर भारतात बंदी आणावी―रामदास आठवले

महाराष्ट्र्र सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची आठवलेंची मागणी

चीन विरोधात रिपाइंचे उद्या शनिवारी दि.20 जून रोजी राज्यभर आंदोलन

मुंबई दि.१९:आठवडा विशेष टीम― चीन ची आर्थिक कोंडी करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर भारताने केला पाहिजे. भारतात 15 करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप मुळे चीन ला कोट्यावधींचा फायदा होतो. ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीन च्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे तसेच चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी; माझी सर्व भारतीयांना नम्र विनंती आहे की त्यांनी चिनी व्हिडियो ऍप टिकटॉक चा बहिष्कार करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    चीन ने लडाख च्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले त्यात 20 भारतीय शूर जवान शहीद झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आम्ही करीत असून उद्या धोकेबाज राष्ट्र असणाऱ्या चीन च्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून रिपाइं चे कार्यकर्ते चीन च्या राष्ट्रध्वज जाळून चीन चा राज्यात सर्वत्र निषेध करणार आहेत.अशी घोषणा ना रामदास आठवले यांनी केली.

    चीन विरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा विचार पुढे येत असताना महाराष्ट्र्र राज्य सरकार ने चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीशी पुण्यातील तळेगाव येथे स्पोर्ट कार बनविण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी 7 हजार 600 कोटींचा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला आहे. हा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित रद्द करावा आणि चीन ची आर्थिक कोंडी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.