अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणसामाजिक

बीड जिल्हा काँग्रेसने सामाजिक उपक्रम राबवून खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा केला ;कोरोना योद्ध्यांचा सन्मान,गरजूंना अन्न पाकिटे वाटप,वृक्षारोपण

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने जिल्ह्यात सर्वञ विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खा.राहुलजी गांधी यांचा शुक्रवार,दिनांक 19 जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या निमीत्ताने काँग्रेस पक्ष कार्यकर्ते यांनी गरजूंना अन्न पाकिटे वाटप केले,वृक्षारोपण करून कोरोना विषाणू साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळी विविध माध्यमातून मदत व सहकार्य करणा-या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.या उपक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते,आजी माजी पदाधिकारी,सर्व सेल,विभाग,जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

याबाबत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खा.राहुलजी गांधी यांचा 19 जूनला असणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला.राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,आदरणीय खा.राहुलजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात सर्वञ गरजू लोकांना अन्न पाकिटे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.तसेच कोरोना संकटकाळी विविध माध्यमातून मदत व सहकार्य करणारांचा सन्मान करण्यात आला.अंबाजोगाई शहर व परिसरातील 555 गरजूंना अन्न पाकिटे वाटप,555 वृक्षारोपण करण्याचा संकल्प आणि प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

यांचा झाला सन्मान..!

कोरोना योद्धा म्हणून
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,डॉ.सिद्धेश्वर बिराजदार,डाॅ.अनिल मस्के, डाॅ.एस.वाय.गित्ते, डाॅ.एस.डी.कांबळे,डाॅ.यु.पी.जोशी,डाॅ.ए.एस.स्वामी,डाॅ.दिपक लामतुरे,डाॅ.नामदेव जुने,डाॅ.एस.ए.चौधरी,डाॅ.राहुल हाके पाटील, डाॅ.विशाल लेडे, डाॅ.एस.एस.चव्हाण, डाॅ.जी.बी.पावडे, डाॅ.जितसेन मन्ना, डाॅ.शाहिद, डाॅ.रोहितकाकानी,डाॅ.नितिन चाटे,डाॅ.मनोज डोंगरे,डाॅ.सतीश गीरीबोनवाड,डाॅ.एकनाथ शेंडगे, डाॅ.अविनाश काशिद तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे,सह.पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे,पोलीस उपनिरीक्षक सुचिता माधवराव शिंगाडे,अभिमान भालेराव,महादेव नवले,मनोज कुलकर्णी,कल्याण देशमाने,प्रकाश वाघमारे,विलास तुपारे,विष्णू नागरगोजे,श्रीकांत चौधरी,तेजस वाहुळे,गोविंद येलमाटे,मारूती कांबळे, नारायण गायकवाड,रमेश पुरी,ज्ञानोबा साठे,हनुमंत घोडके,संजय बारगजे, नरहरी नागरगोजे आणि अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप,नगर अभियंता विश्वनाथ लहाने,नगर रचनाकार अजय कस्तुरे,ए.जे.चव्हाण,

अभियंता पाणीपुरवठा मनीषा कोंडेकर,स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांचा सन्मान करण्यात आला. अंबाजोगाईत या सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर, खालेद चाऊस,गणेश मसने,सज्जन गाठाळ,डी.के.कांबळे,माणिक वडवणकर,शेख मुख्तार,दिनेश घोडके,अकबर पठाण,अशोक देवकर,सुधाकर टेकाळे,भारत जोगदंड,सचिन जाधव,अमोल मिसाळ,शेख अकबर,अजीम जरगर,जावेद गवळी,प्रताप देवकर, माऊली वैद्य,अनिल औचित्ते,विराज धिमधीमे,महेश वेदपाठक,अमेर खतीब यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.संपुर्ण बीड जिल्ह्यातील कार्यक्रमांमध्ये जिल्हा,तालुका व ग्रामपातळीवरील पक्षाचे सर्व पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घेतला.

काँग्रेस पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम..!

प्रांताध्यक्ष मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून आणि माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख,प्रदेश समन्वय समितीचे मराठवाडा विभागाचे बसवराज पाटील मुरूमकर,जितेंद्र देहाडे यांचे मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात मा.राहुलजी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी,ब्लॉक काँग्रेस कमिट्या व फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि सर्व सेल व विभाग यांनी मिळून सामुदायीक स्वयंपाकघरातून
(Community Kitchens) अन्नाची पाकिटे बनवून जिल्ह्यातील गरजू लोकांना वाटली.तसेच कोवीड 19 साथ रोगाच्या संकटात निस्वार्थीपणे लढा देणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस यंत्रणा व इतर कोरोना योद्धा यांचा यथोचित प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.या सोबतच न्यु व्हिजन पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले.या निमित्ताने लवकरच 500 वृक्षरोपांची लागवड करण्यात येईल.तसेच आरोग्य सेवेतील,स्वच्छता कर्मचारी,पोलीस यंत्रणा व इतर क्षेत्रातील उर्वरित कोरोना योद्ध्यांचा ही लवकरच सन्मान करण्यात येईल.शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व अटी, नियमांचे पालन केले.या उपक्रमात बीड जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी आमदार,स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सर्व फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व पदाधिकारी यांनी सहभागी होवून मा.राहुलजी गांधी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा केला.

―राजकिशोर मोदी,(अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.