स्वयंम प्रेरणेतून उद्योजक तयार होतात- उद्योजक रामचंद्र पेरे गुरुजी

आठवडा विशेष|ज्ञानेश्वर धोंड़ू पाटील
सोयगाव,ता.१४: कोणत्याही व्यक्तीला उद्योक करायचा असेल तर त्या व्यक्तीला प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवता येत नाही तर त्या व्यक्तीची स्वयंम प्रेरणा हीच त्या व्यक्तीला उद्योजक बनवू शकतो. केवळ त्या व्यक्तीला समाजाची गरज कळाली पाहिजे असे प्रतिपादन उद्योजक रामचंद्र पेरे गुरुजी यांनी गुरुवारी सोयगावला केले.
येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाने आयोजित एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे अध्यक्षस्थानी होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.मुस्तजीब खान व महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळाचे विभागीय अधिकारी श्री सुदाम नलावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे यांनी उद्योजकता विकास कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. या कार्यशाळेचे सूत्र संचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे,पदव्युत्तर समन्वय डॉ.सी. यु भोरे,डॉ प्रशांत देशमुख,डॉ.लक्ष्मीनारायण कुरपटवार,प्रा निलेश गावडे,प्रा.निकम,कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ आर आर खडके, कार्यालयीन अधीक्षक श्री.पंकज साबळे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.