बीड दि.१९:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)― बीड तालुक्यातील मौजे मोरगाव ग्रांमपंचायत अंतर्गत जाधववाडी, साधारणतः १५० लोकसंख्येचं गाव ,मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग लगत ,३ वर्षापासुन रखडलेल्या या महामार्गामुळे दर पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात आणि शेतात शिरते आणि घरांतील सामान आणि शेतीचे नुकसान होते. वारंवार जिल्हा प्रशासनाला व अभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले.परंतु कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे अखेर आज ५०-६०हजार रुपये खर्च करून नळ्या टाकल्या आहेत.
मनिषा /संगिता जाधव : ग्रामस्थ
महामार्गाची उंची आमच्या घरापेक्षा ५-६ फुट उंच आहे, रस्त्याला नाली बांधकाम न केल्यामुळे पावसाचे पाणी घरात व शेतात शिरून नुकसान होते, रात्र जागून काढावी लागते तर शेतातील बि-बियाणे, खते, बांधबंदिस्ती फुटुन शेतातील माती वाहुन जाते. जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करते.
भारत / गणपत/वामन/सर्जेराव जाधव : तक्रारदार, जाधववाडी ग्रामस्थ
गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देत आहोत गेल्यावर्षी दि.२७/०६/२०१९ ला निवेदन दिले होते आणि रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम न केल्यामुळे पावसाचे पाणी घरात व शेतात शिरून नुकसान झाले असून संबंधितांना नाली बांधकाम करण्यास सांगावे अशी विनंती केली होती
स्वखर्चाने नळ्या टाकल्या : गणेश /भारत जाधव
दरवर्षी घरातील सामान आणि शेतातील बि-बियाणे,खंत , माती यांचे नुकसान होत आहे, ३ वर्षांपासून प्रशासन लेखी तक्रार देऊनही लक्ष देत नाही, शेवटी आज ५०-६० हजार रुपये खर्च करून नळ्या आणुन टाकल्या आहेत.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते ―
मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग ३ वर्षांपासून रखडलेला असुन दरवर्षी जाधववाडी येथील ग्रामस्थांच्या घरात आणि शेतात पावसाळ्यात पाणी शिरून नुकसान होते. शासकीय नियमानुसार वस्ती असलेल्या ठिकाणी नाली बांधकाम व ईतर ठिकाणी रस्त्यांचे पाणी नाली काढून देऊन कुणाचेही नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेणे बंधनकारक आहे.परंतू मुजोर ठेकेदार शासकीय नियम डावलून जाधववाडी ग्रामस्थांचे नुकसान करत आहेत. याउलट ससेवाडी येथे कुठलीही रसत्यालगत वस्ती नसताना त्याठिकाणी मात्र सध्या नळ्या टाकण्याचे काम सुरू आहे.याप्रकरणी नितिन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकारी मार्फत लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.
"आपल्या परिसरात(बीड जिल्हा) सामाजिक प्रश्न ,अपहार ,भ्रष्टाचार ,एखादा अधिकारी शासकीय काम करत नसेल तर संपर्क करा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.९४२००२७५७६ यांच्याशी."