सोयगाव,दि.१९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव पंचायत समितीच्या औरंगाबादेतून ये-जा करणाऱ्या एका अधिकाऱ्याचा गुरुवारी घाटी प्रशासनाने घेतलेला स्वॅब शुक्रवारी सकारात्मक आढळल्याने सोयगाव शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.सकारात्मक आढळलेला अधिकारी हा बुधवारी सोयगाव तालुक्यातील वैयक्तिक शौचालयांच्या सत्यता तपासणी दौऱ्यासाठी दहा ग्रामपंचायतींना भेटी दिल्या असल्याने तालुक्यातही खळबळ उडाली आहे.
सोयगाव पंचायत समितीच्या एका अधिकार्याचा कोरोना संसर्गाचा औरंगाबादला घाटी रुग्णालय प्रशासनाने घेतलेला स्वॅब शुक्रवारी सकारात्मक आढळल्याचे वृत्त सोयगावात धडकताच शासकीय कार्यालयांची धडकी भरली होती.कोरोना संसर्गाचे रेड झोन असलेल्या औरंगाबादेतून हा अधिकारी नियमित ये-जा करत होता.बुधवारी या अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांच्या पथकांसह वैयक्तिक शौचालये सत्यता पडताळणी दौरा सोयगाव तालुक्यात केला होता.त्यामुळे या दहा गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये धडकी भरली असून आरोग्य विभागाकडून या अधिकार्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम शुक्रवारी सायंकाळपासून हाती घेण्यात आले आहे.पंचायत समितीचा हा अधिकारी औरंगाबादेतून नियमित ये-जा करणारा होता.त्यामुळेच बाधा झाल्याचा संशय आहे.
त्या अधिकाऱ्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना होमकोरोटाईन करण्याचे आदेश-
स्वच्छ भारत अभियान बी.आर.सी प्रमुख अधिकारी सकारात्मक आढळल्याने त्या अधिकाऱ्याच्या संपर्कातील सर्वांची लाईन लिस्ट तातडीने आरोग्य विभागाकडून मागविण्यात आली असून संपर्कातील सर्वांना होमकोरोटाईन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने पंचायत समितीला दिल्या आहे.