महाराष्ट्र राज्यसामाजिक

सोयगाव - त्रुटीअभावी टँकरचे प्रस्ताव परत,दोन गावांची तहान वाढली

फर्दापूर,उमरविहीरेच्या प्रस्तावात आढळल्या त्रुटी


आठवडा विशेष|ज्ञानेश्वर पाटील

सोयगाव दि.१४ : तालुक्यातील पाणी टंचाईच्या झळा गंभीर होत असतांनाच पाच गावांच्या टंचाईचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाला पाठविताच फर्दापूर आणि उमरविहीरे या दोन गावांच्या टंचाई प्रस्तावात अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरींचे अंतर पंचायत समितीच्या विभागाच्या आणि महसूल विभागाच्या पाहणीत तफावत आढळल्याने हे प्रस्ताव माघारी आले आहे.त्यामुळे गंभीर पाण्याच्या झळा सोसणाऱ्या या दोन गावांनाच पुन्हा आठवडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.
अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या फर्दापूर ता.सोयगाव ला तीव्र पाणी टंचाईचा विषय नवखा ठरणार नाही सतत तीस वर्षापासून विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ फर्दापूरच्या तेरा हजार पाचशे नागरीकांवर येत असतांना यंदाच्या वर्षात ऐन हिवाळ्यातच फर्दापूर कोरडेठाक झाले असल्याने,या गावातील नागरिकांना भल्या पहाटेच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्यातच उमरविहीरे या गावातून पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामस्थांनी अक्षरश स्थलांतर केले आहे.दरम्यान या दोन्ही गावांच्या टँकरचे प्रस्ताव टँकर भरून आणण्यासाठी अधिग्रहण केलेल्या विहिरीचे अंतर पंचायत संमितीने एक किलोमीटर दाखविले असून महसूलच्या टंचाई निवारण कक्षाकडून दोन कि.मी पेक्षा जास्त दाखविण्यात आल्याने या दोन्ही विभागाच्या तफावतीत प्रस्तावच माघारी आल्याने गोंधळ उडाला आहे.दरम्यान शासन निकषाप्रमाणे टँकर भरण्यासाठी उपलब्ध असलेली विहीर एक किमी अंतराच्या आत असल्यास त्या ठिकाणावरून टँकर न भरता थेट पाईपलाईन करण्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे तफावतीत या दोन गावांचे टँकर मंजुरीचे प्रस्ताव अडकले आहे.


फर्दापूर आणि उमरविहीरे या दोन्ही गावांच्या विहिरींची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्षात जायमोक्यावर उपस्थित असल्याने अंतर कमी असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही,पंचायत समितीकडून चूक झाली असेल त्यात सुधारणा करून दोन्ही गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येतील पण त्याआधी या गावांना खासगी टँकरचे तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल.
प्रवीण पांडे
तहसीलदार सोयगाव


फर्दापूर आणि उमरविहीरे या गावांच्या टँकरचे प्रस्तावमध्ये संबंधितांकडून किरकोळ चूक झाली असेल हे प्रस्ताव नव्याने परत पाठविण्यात येतील तोपर्यंत खासगी टँकरने पाणी देण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.एम.सी राठोड
गटविकास अधिकारी सोयगाव


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.