कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युज

बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड, दि.१९:आठवडा विशेष टीम― बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले २ रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील छोटीराज गल्ली कारंजा परीसर येथील संध्या दत्तात्रय वेदपाठक यांच्या घरापासून ते मोहम्मद मुश्ताक बागेपर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.