पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशेतीविषयक

पाटोदा तालुक्यात शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगभग सुरू , शेतकऱ्यांची आधुनिक पेरणीयंत्राला पसंती

पाटोदा:आठवडा विशेष टीम― दरवर्षीच्या प्रमाणे या वर्षी शेतकऱ्यांना कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिल मे महिन्यातंच नांगरणी, मोगडा-पाळी इत्यादी मशागतीची कामे उरकून घेऊन बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी दमदार पावसाची वाट पाहत होता.यावर्षी चक्रीवादळ आल्याने जूनच्या पहिल्याच आठवड्यात रोहिणी नक्षत्रात भरपुर पाऊस पडला पण मृग नक्षत्र निघाले नसल्याने पुन्हा पाऊस पडेल की नाही म्हणून शेतकऱ्यांनी आखडता हात ठेवत काही प्रमाणात पेरणी केली होती.
खरीप पेरणी ही मृग नक्षत्र निघाल्यानंतर सुरू होते,दि.१०-११ जूनला दोन दिवसात जो दिलासादायक पाऊस तालुक्यात पडल्या त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सज्ज होऊन तिफण औत यांच्यावर जय गणेशा करून खरिपाच्या पेरणीला सुरवात केली.
पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन या कामी कमी पाण्यावर व अल्पसुपिक शेतात येणाऱ्या पिकाचा पेरा जास्त केला आहे.या पिकाला मेहनत कमी लागते व जास्त प्रमाणात उत्पादन व चांगल्या प्रतीचा भाव या पिकापासून मिळतो, त्याचबरोबर तुर, मुग, उडीद, बाजरी, कापूस, मका,सुर्यफुल, आळसुंदा,या तृडधान्याचा पेरा खडकाळ व पाणउतार शेतीत जास्त आहे.
शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस वेळेवर पडल्याने व पेरणीयोग्य वापसा असल्याने अनेक छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी आधुनिक पेरणी यंत्राला पसंती दिली आहे,अगदी कमी वेळेत कमी श्रम व कमी रोजगार यामुळे शेतकरी बैलांच्या पेरणीपेक्षा ट्रॅकरवर चालणाऱ्या पेरणी यंत्राला पसंती दिली आहे.
तालुक्यातील ढाळेवाडी, पारगाव, गांधानवाडी शिवारात पेरणी सुरू असताना दत्ता हुले यांनी त्या ठिकाणची माहिती घेतली आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  "गेल्या वर्षी २७ जुन नंतर पेरणीझाली होती,पण यावर्षी मृग नक्षत्रात पेरणी झाल्यामुळे पिकाला चांगला उतार मिळेल अशी आशा आहे."
  ―जयराम वाळेकर (शेतकरी)

  " ट्रॅकरवर पेरणीयंत्र आल्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ व कमी कष्ट झाल्याने दिलासा मिळत आहे,आम्हालाही रोजगार मिळत आहे." ―रामदास हुले (ट्रॅकर मालक)

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.