महाराष्ट्र राज्यशेतीविषयक

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे मुदत वाढवा,शेतकऱ्यांची मागणी

दुसर्याच दिवशी तब्बल निम्म्याहून अधिक शेतकरी वंचित

आठवडा विशेष|ज्ञानेश्वर धोंड़ू पाटील
सोयगाव दि.१५:प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या माहिती संकलनाच्या दुसर्याच दिवशी गुरुवारी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांची घोषणापत्रे संकलित करण्याच्या कामांची अपूर्णता राहिल्याने शुक्रवारी या योजनेचा अंतिम अहवाल तहसील कार्यालयात सादर करावयाचा आहे.परंतु अद्यापही निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांची स्वयंघोषणा पत्र बाकी राहिली असल्याने गोंधळ उडाला आहे.
सोयगाव तालुक्यात ४३००० हेक्टरवरील ८५ हजारच्यावर खरीप उत्पादक शेतकरी संख्या आहे.त्यातच अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या दांडगी आहे.परंतु निम्म्याहून अधिक गावात कागदपत्रांच्या जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याने गुरुवारी पथकांकडून शेतकऱ्यांच्या माहिती आणि डेटा संकलित करण्यात फारसे यश आलेले दिसून आले नाही.काही अल्पभूधारक शेतकर्यांकडे मोबाईलच नसल्याचे पथकांच्या निदर्शनास आले होते.स्वयंघोषणा पत्राची कमतरताही आढळून आल्याने पथकांचीही तारांबळ उडाली होती.शुक्रवारी अंतिम मुदत असल्याने स्वयंघोषणा देण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.