कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हाप्रशासकीयब्रेकिंग न्युज

केंद्रीय पथकाकडून जळगाव जिल्ह्याचा मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश

जळगाव, दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी. असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी दिले. कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक लोक प्रतिनिधीं तसेच स्वयंसेवक यांचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या समवेत आढावा बैठक पार पडली. यावेळी अलोने बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button