अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न ,राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन केंद्रांकडून आयोजन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन केंद्रांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते."संशोधन पद्धती" हा या वेबिनारचा विषय होता.या वेबिनारमध्ये सुमारे 3,949 विद्यार्थी व संशोधकांनी नोंदणी केली होती.अनेकांनी ऑनलाईन सहभाग ही घेतला.

राष्ट्रीय वेबीनारचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रीय वेबीनारच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादचे राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ.सुजा शाकीर यांनी राष्ट्रीय वेबीनारच्या पहिल्या सत्रामध्ये "समस्या,सुत्र व गृहितके" या विषयावर शेतक-यांच्या आत्महत्या यांचा संदर्भ घेऊन संशोधकांना व वेबिनारसाठी ऑनलाईन सहभागी झालेल्या देशातील विविध विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की,"शेतकऱ्यांच्या आत्महत्या" ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती देश पातळीवरील आहे.तर दुस-या सत्रामध्ये महात्मा गांधी महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण जोगदंड यांनी पीएच.डी करणा-या विद्यार्थ्यांना संदर्भ कशा पद्धतीने वापरावेत या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वरून विस्तृत असे मार्गदर्शन केले वेबिनारच्या तिस-या सत्रात कर्नाटक येथील एस.एस.कला महाविद्यालय टिपी सायन्स इंस्टीट्यूट, सांकेश्वर येथील प्रा.डॉ.बालागौडा पाटील यांनी विद्यार्थ्यांना "डेटा कलेक्शन आणि अॅनालिसेस" या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन वरून अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले.या वेबिनारच्या शेवटच्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.प्रशांत यांनी वेबिनार संबंधी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे यांनी संपूर्ण देशभरातून नोंदणी केलेल्या 3 हजार 949 विद्यार्थी आणि वेबिनार मध्ये ऑनलाईन सहभागी झालेल्या मान्यवरांचे आभार मानले.राष्ट्रीय वेबिनार मध्ये राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.दिनकर तांदळे,अर्थशास्त्र संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.धर्मराज तांदूळजेकर,कार्यवाहक प्रा.डॉ.वसंत गायकवाड यांनी पुढाकार घेऊन अतिशय चांगल्या एक दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील वेबीनारचे आयोजन केले.त्याला संपूर्ण देशभरातून राज्यशास्ञ व अर्थशास्ञ विषयाचे संशोधक व विद्यार्थी यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.