सोयगाव,दि.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सरकार आणि बँका यांच्यामध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामाच्या तोंडावरच परिस्थिती बिकट झालेली आहे.शासन निर्णयाची बँकाचे अधिकारी अंमलबजावणी न करता वेगळाच निर्णय घेतात त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी भरडल्या जात आहे या कारणामुळे तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध करत सोयगाव तहसील कार्यालयावर निदर्शने केली.
तालुका भाजपच्या वतीने भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष मंगेश सोहनी यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या कार्यपद्धतीचा जाब विचारत निषेध केला आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रवीण पांडे यांना सुपूर्द करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांनी निवेदन स्वीकारले यावेळी नगराध्यक्ष कैलास काळे,शहरध्यक्ष सुनील ठोंबरे,मंगेश सोहनी आदींनी सामाजिक अंतर पाळून निवेदन सादर केले आहे.
छायाचित्रओळ-सोयगाव तहसील कार्यालयावर निदर्शनाचे निवेदन देतांना मंगेश सोहनी,कैलास काळे व इतर.