गोंदिया जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्या - भाजपाची मागणी

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

अहेरी:राहुल उके― कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सद्या मोठ्या संकटात सापडला असताना विविध बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे त्यांच्या सहानभुतीने विचार करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना नवीन पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आज भाजपा अहेरी तालुकातर्फे तहसीलदार अहेरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालय अहेरी येथे मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गुहे यांनी स्वीकारले. यावेळी भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा जिल्हा सचिव संदीप कोरेत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका महामंत्री पप्पु मद्दीवार व मुकेश नामेवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.