अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

लोकसेवा,राज्यसेवा,नवोदय परीक्षेतील यशस्वितांचा अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने ह्रद्य सत्कार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विविध क्षेत्रात कार्य करून लोकसेवा,राज्यसेवा आणि नवोदय परीक्षेत स्पृहणीय यश संपादन करून सर्वदूर अंबाजोगाईचा नांवलौकिक वाढविणार्‍या गुणीजणांचा बीड जिल्हा काँग्रेसचे तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते सोमवार,दिनांक 22 जून रोजी सहकार भवन येथे हृद्य सत्कार करण्यात आला.

शहराच्या प्रशांतनगर भागातील सहकार भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेसचे व अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी तर प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेवक मनोज लखेरा,सुनिल व्यवहारे,बीड जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष कचरूलाल सारडा,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे मराठवाडा अध्यक्ष राणा चव्हाण,विजय रापतवार,अजीम जरगर,अंबाजोगाई पीपल्स बँकेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संजय जड आदी मान्यवरांची तसेच कोकाटे,रांजणकर,सारणीकर,चौधरी कुटुंबातील सदस्य यांची याप्रसंगी उपस्थिती होती.या कार्यक्रमात लोकसेवा व राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेत सर्वदूर अंबाजोगाईचा दबदबा निर्माण करणारे अजय कोकाटे हे अंबाजोगाई येथील न्यायालयात लिपिक असणारे विलास कोकाटे यांचे चिरंजीव अजय विलास कोकाटे हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपअधीक्षक झाला आहे.त्याचा पोलीस उपअधीक्षक संवर्गात राज्यात तृतीय क्रमांक आला आहे.अजयचे शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण लातूरच्या दयानंद महाविद्यालयात पूर्ण केले. सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.त्यानंतर सलग चार वर्षे विनाखंड अभ्यास केल्यानंतर अजयला हे यश मिळाले असून तो पोलिस उपअधीक्षक झाला आहे.येथील योगेश चंद्रकांत रांजणकर याने पहिल्याच प्रयत्नात स्पृहणीय यश प्राप्त करत पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली.योगेशचे शालेय शिक्षण योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले.त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण लातूरच्या दयानंद महाविद्यालयात झाले.पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेत पदवी संपादन केली.त्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये एक वर्ष नोकरी केली.एमपीएससीच्या तयारी साठी कुठलीही शिकवणी न लावता त्याने अंबाजोगाईत राहूनच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले.योगेशच्या वडिलांचे अंबाजोगाईतील आंबेडकर चौकात किराणा दुकान आहे.योगेशचा पोलीस उपअधीक्षक संवर्गात राज्यात १९ वा क्रमांक आला आहे.तसेच येथील अंबिका सोसायटीतील योगेश राजीव सारणीकर याची पहिल्याच प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे.योगेशचे शालेय शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले तर बारावी लातूरच्या दयानंद महाविद्यालात झाली.अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्याने खाजगी कंपनीत नोकरी केली. पुढे त्याची महाराष्ट्र बँकेतही अधिकारी पदावर निवड झाली होती.एक वर्षातच त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्याने राज्यसेवेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात हे यशोशिखर गाठले.या सोबतच श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या विद्यालयाची इयत्ता वर्ग 5 वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु.अनुष्का विक्रम चौधरी हिची नवोदय केंद्रीय विद्यालयासाठी वर्ग 6 वी साठी निवड झाली आहे.या
भुमीपुञांनी संपुर्ण महाराष्ट्रात अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा फेटा बांधून,शाल व पुष्पगुच्छ देवून यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे तसेच अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सत्कार केला.याप्रसंगी अजय विलास कोकाटे,योगेश चंद्रकांत रांजणकर,योगेश राजीव सारणीकर आणि विद्यार्थीनी कु.अनुष्का विक्रम चौधरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार विजय रापतवार यांनी मानले.

अंबाजोगाईचा नांवलौकिक वाढविणा-या गुणीजणांचा सार्थ अभिमान-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रात नांवाजलेले आहे.अंबाजोगाईतील प्रज्ञावान व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून शहराचे नांव वेळोवेळी उंचावलेले आहे.येथील न्यायालयात लिपिक असणारे विलास कोकाटे यांचे चिरंजीव अजय विलास कोकाटे हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपअधीक्षक झाला आहे.त्याचा पोलीस उपअधीक्षक संवर्गात राज्यात तृतीय क्रमांक आला आहे.तसेच अंबाजोगाई येथील योगेश चंद्रकांत रांजणकर याने पहिल्याच प्रयत्नात स्पृहणीय यश प्राप्त करत पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे.येथील अंबिका सोसायटीतील योगेश राजीव सारणीकर याची पहिल्याच प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे.या सोबतच श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या विद्यालयाची इयत्ता वर्ग 5 वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु.अनुष्का विक्रम चौधरी हिची नवोदय केंद्रीय विद्यालयासाठी वर्ग 6 वी साठी निवड झाली आहे.राज्यसेवा आणि लोकसेवा आयोगाच्या व नवोदयच्या परिक्षेत सहभागी यशस्वी सर्व गुणीजणांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी हा कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित केला आहे.या मान्यवरांच्या कार्याची प्रेरणा घेवून इतरांनी प्रेरीत व्हावे.हाच या मागचा विधायक उद्देश असल्याचे प्रतिपादन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.