पाटोदा:नानासाहेब डिडुळ― कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सकाळी 07:30 ते सायंकाळी 06.30 वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.पाटोदा शहरातील छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यापारी व हातावर पोट भरणारे यांना सोशल डिस्टन्स (अंतर) ठेवुन, तोंडाला मास्क वापरून शासनाचे सर्व नियम पाळून शासनाच्या नियमांचे उल्लघन न करता शहरातील दुकाने चालु ठेवण्यास व हातावर पोट भरणाऱ्या व्यवसायकाचे दुकाने सकाळी 07:30 ते सकाळी 06:30 वाजेपर्यंत चालु ठेवण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन नगरपंचायत चे नगराध्यक्षा अनिता संदीप नारायणकर ,जरीना अब्दुल्ला सय्यद ,मनिषा बळीराम पोटे ,बालाजी जाधव ,आसिफ सौदागर ,नय्युम पठाण ,राजेंद्र जाधव ,शरद बामदळे ,सोमिनाथ कोल्हे ,संदीप जाधव यांनी तहसीलदार पाटोदा यांना दिले आहे.