प्रतिनीधी दि.२४: तिडका (ता.सोयगाव) येथील नदीकाठच्या एका गोठ्यास अचानक आग लागुन त्यापाठोपाठ जवळच असलेल्या सात घरांना आग लागल्याने घरगुती साहीत्य जळुन खाक झाल्याची घटना रविवार(ता.२४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली दरम्यान ह्या घटनेमध्ये जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तिडका गावाच्या नदीलगत शेनपडु मोरे यांचे जनावरांचा गोठा असुन त्यामध्ये चाराची कुट्टी व शेती अवजारे होती ह्या गोठ्यास तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली ह्या आगीचा लोळ वाढत जाऊन जवळ असलेल्या साहेबखान नुरमहमंद पठाण, कुबरा सय्यद गफ्फार,समशेरखान रहेमतखान पठाण, शरीफ बशीर तडवी, हबीब बशिर तडवी,अकबर सुलेमान तडवी , जुम्मा तुराब तडवी, अशा सात घरांना आगीने विळखा मारला गावामध्ये शुभविवाह सोहळा होता आग लागल्याची वार्ता गावात पसरताच सम्पुर्ण गाव त्या ठीकाणी जमा झाले होते ही आग विजवण्यासाठी मुबारक पटेल, निसार तडवी, रबिब तडवी, न्यानेश्वर होळकर, उत्तम दसरे आदी तरुणांनी तब्बल एक तासानतंर आग विजवण्यास परीश्रम घेतले सर्व कुटुब गोरगरीब असुन रविवार बाजारचा दीवस असल्याने यातील काही कुटंबातील नागरीक बाजार गेले होते तर गेल्या चार दीवसापासुन उन्हाची तीव्रता वाढल्याने जास्त प्रमाणात उकाडा होत असल्या कारणाने घरची मंडळी बाहेरील निबांच्या सावलीमध्ये बसलेले होते सुदैवाने ह्या घटनेत कुणासही ईजा झाली नाही दरम्यान ह्या आगीमध्ये प्रत्येक कुटुबातील धान्य कपडे व ईतर घरगुती साहीत्य जळुन खाक झाले आहे असुन ग्रामस्यांच्या सागीतल्यावरुन जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले आहे ह्या घटनेची माहीती सोयगाव तहसिलला देण्यात आली असुन त्यानसार सदरील घटनेचा तात्काळ पंचनामा करुन येथील कुटुबांना आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्यामधुन होत आहे.
0