अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा रंगनाथ नाना काळे यांनी डॉ अशोक नाईकवाडे यांचा ग्रंथ भेट देऊन सेवा गौरव केला
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे हे सेवानिवृत्त झाले. डॉ नाईकवाडे हे सप्टेंबर 2017 पासून महाविद्यालयात रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन, वृक्षारोपण, आयएसओ मूल्यांकन आदी कार्य पूर्ण झाले. डॉ नाईकवाडे यांनी महाविद्यालयाच्या विकासात मोलाची भर टाकली असे उदगार संस्थेचे अध्यक्ष मा रंगनाथ नाना काळे यांनी काढले. या वेळी उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, डॉ रावसाहेब बारोटे, कार्यालयीन अधीक्षक श्री पंकज साबळे, राजू आहिरे, राजू दुतोंडे, कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.