औरंगाबाद जिल्हाशैक्षणिकसोयगाव तालुका

लक्ष्मीताई करंकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सोयगावला सत्कार करण्यात आला

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०७: एखाद लक्ष डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास आणि मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते तेव्हा आई वडिलांनी मुलींवर विश्वास ठेऊन त्यांना शिक्षण घेऊ द्या असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या लक्ष्मीताई करंकर यांनी शुक्रवारी(ता.५)सोयगाव येथे केले.सोयगाव येथील तीळवन तेली समाजाच्या वतीने पहूर (ता.जामनेर.जि जळगाव )येथील लक्ष्मीताई करंकर यांची एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल श्रीराम मंदिर येथे जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा प्रतिभाताई बोड्खे या होत्या.उपनगराध्यक्षा मंगलाताई राऊत , सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एकनाथ आगे , सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर , नगरसेविका मनीषाताई चौधरी ,सोयगाव सोसायटी चे चेअरमन राजेंद्र काळे , राष्ट्रवादी कॉँग्रेस चे कार्याध्यक्ष राजेंद्र आहीरे , शहर अध्यक्ष रविंद्र काळे , शिवसेना शहर प्रमुख गजानन चौधरी , अँड योगेश पाटील , विजय काळे , भाजपा शहर अध्यक्ष सुनिल ठोंबरे ,सुरेश चौधरी , चंद्रकलाबाई चौधरी , राहुल चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.तीळवन तेली समाज व नागरिकांनी लक्ष्मीताई करंकर यांचा शाल, श्रीफळ , हार भेटवस्तू देऊन सत्कार केला.एकनाथ आगे , राजेंद्र आहीरे , अँड योगेश पाटील , डॉ नेहा चौधरी , अरुण सोहनी , बाळ कीर्तनकार जान्हवी सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देतांना लक्ष्मीताई यांनी सांगितले की जि प शाळेत शिक्षण घेऊन मी खूप अभ्यास केला मेहनत घेतली.माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट घेऊन माझे शिक्षण पूर्ण केले प्रतेक पुरुषाच्या यशामागे एक स्री असते परंतु माझ्या यशामागे माझे पती माझ्यापाठी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळेच यशस्वी होऊ शकले.इतर पालकांनी देखील मुलांप्रमाणे मुलींना शिकवा त्या नक्कीच तुमच उज्ज्वल करतील असे सांगून मुलींनी जिद्द ठेवून मेहनत केल्यास यश हमखास यश मिळेल असा संदेश दिला.
कार्यक्रमासाठी मोतीराम पंडित , सुधाकर सोहनी , दिलीप माळोदे,गणेश बागले,मंगेश सोहनी,संतोष सोनवणे,कैलास पंडित , बबलू सोहनी , गजानन राऊत , कमलबाई सोहनी , रविना सोहनी , तुळसाबाई सोहनी , गोदावरी सोहनी , संजय मिसाल , गणेश माळोदे , गंगाधर सोहनी , भगवान बागले , शंकर माळोदे , नंदू सोहनी , आदींनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक रविंद्र तायडे यांनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजेंद्र दुतोंडे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button